Kokan: प्रज्ञाशोधमध्ये देसाई स्कूलचे यश; ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये निशांत व पल्लवचे यश

0
39
Brian Development
ब्रेन डेव्हलपमेंट आणि प्रज्ञाशोधमध्ये देसाई स्कूलचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- गुरूकूल प्रज्ञा शोध परिक्षेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर यश संपादन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुले-पाळत-आहेत-धर्मविर-बल/

 यामध्ये राही मोबारकर (राज्यात १५वी, तालुका व जिल्हास्तरावर प्रथम), निशांत कांबळी (राज्यात ७वा, तालुका व जिल्हास्तरावर प्रथम), सैझिन शेख (राज्यात ३१वी, तालुका व जिल्हास्तरावर प्रथम), संजना पेडणेकर (राज्यात ३५वी, जिल्हास्तरावर दुसरी, तालुक्यात प्रथम), पायल नेरूरकर (राज्यात ११वी, तालुका व जिल्हास्तरावर प्रथम) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, सर्व शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये निशांत व पल्लवचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी-ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता दुसरीतील निशांत कांबळी व इयत्ता चौथीमधील पल्लव मेस्त्री यांनी कास्यपदक मिळवित यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मिताली होडावडेकरसर्व शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here